Welcome to the amazing Weblog! Contact Us Explore

सैनिक स्कूल सातारा - माझा अनुभव | Sainik School Satara - My Experience | Information in Marathi

सैनिक शाळा सातारा - माझा अनुभव !

नमस्कार, आज मी सैनिक शाळा सातारा मध्ये घेतलेला अनुभव share करणार आहे. मी सैनिक स्कूल मध्ये इयत्ता ६वी मध्ये प्रवेश घेतला होता. सैनिक स्कूल सातारा विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. चला तर मग सुरु करूयात!

सर्वप्रथम आपण सैनिक स्कूल सातारा विषयी महत्त्वाची माहिती घेवूयात.

सैनिक स्कूल सातारा माहिती

परीक्षेचे नाव अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)
संचालन प्राधिकरण राष्ट्रीय टेस्ट एजन्सी (NTA)
आवेदन प्रक्रिया ऑनलाईन (Online)
Official वेबसाईट www.sainiksatara.org
इयत्ता ६वी साठी जागा मुली - 10 मुले - 80
इयत्ता ९वी साठी जागा मुले - 12
परीक्षेची पद्धत प्रत्यक्ष (Offline)
साठी आयोजित सहावी व नववीच्या वर्गात सैनिक शाळेत प्रवेशासाठी
निवड प्रक्रिया
  • लेखी परीक्षा 
  • वैद्यकीय चाचणी
परीक्षेची वारंवारता वार्षिक (Annually)
   
सैनिक शाळा सातारा - एक अनुभव ! | Sainik School Satara - an Experience

सैनिक स्कूल सातारा मराठी मधून माहिती | Sainik School Satara information in Marathi

सैनिक स्कूल सातारा या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सशस्त्र दलात करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे. अकादमीमध्ये एक कठोर प्रशिक्षण कार्यक्रम आहे ज्यामध्ये शारीरिक प्रशिक्षण, युद्धसामग्री प्रशिक्षण आणि लष्करी कवायतींचा समावेश आहे. हे कंडिशनिंग केवळ विद्यार्थ्यांना शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित करण्यास मदत करत नाही तर त्यांना सैन्यात भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया देखील देतात. सेवेतील करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, सैनिक स्कूल सातारा शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम शिक्षण प्रदान करते. 

विद्यार्थी सर्वसमावेशक शिक्षण स्वीकारतील याची खात्री करण्यासाठी अकादमी गणित, शहाणपण, सामाजिक विद्या, भाषा आणि मानवता यासह विविध विषयांचे शिक्षण देते. अकादमी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालयासारख्या खजिन्यांमध्ये प्रवेश देखील प्रदान करते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्रातील सर्वात नवीन घडामोडींवर अद्ययावत राहण्यास मदत होते. अकादमी खेळ आणि व्यभिचारी कंडिशनिंगवर देखील जोरदार भर देते. कॅलिस्थेनिक्सपासून ते घराबाहेरच्या साहसी कंडिशनिंगपर्यंत, सैनिक स्कूल सातारा येथील विद्यार्थ्यांना विविध खेळ आणि कंडिशनिंगमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. हे कंडिशनिंग विद्यार्थ्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत करत नाही तर त्यांना त्यांचे सहकार्य आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ देखील देतात.

प्रवेश प्रक्रिया (Admission process)

सैनिक शाळा सातारा मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम आपल्याला लेखी परीक्षा द्यावी लागते. बरेच मुले लेखी परीक्षा देतात. त्यातून 250-300 Candidates मेडिकल टेस्ट साठी पात्र होतात. त्यातून 100 मुलांची निवड होते. पुढची प्रक्रिया तुम्हांला शाळेद्वारे कळवली जाते.

sainik-school-satara-logo

पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • इयत्ता सहावी: मुलाचा जन्म 01 एप्रिल 20010 ते 31 मार्च 2012 दरम्यान झाला पाहिजे.
  • नववी इयत्ता: मुलाचा जन्म 01 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 दरम्यान झाला पाहिजे. मुलाने मान्यताप्राप्त शाळेत आठवीत शिकले पाहिजे.

लेखी परीक्षेचे केंद्र (Written Exam Centre)

खाली काही मुख्य AISSEE 2023 च्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केला आहे.

इयत्ता सहावीसाठी:
  • अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा आणि सोलापूर
इयत्ता नववीसाठी:
  • सातारा (फक्त एक)

सैनिक स्कूल प्रवेशपत्र (Admit Card)

सैनिक शाळा सातारा प्रवेश 2023 चे प्रवेशपत्र निर्धारित तारखेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होईल. प्रवेश पत्रांची माहिती योग्य प्रकारे तपासण्यासाठी उमेदवारांना सूचित केले जाते. छापील प्रवेश पत्र देखील प्रत्येक उमेदवाराला टपालाने पाठवले जाईल.

माझा वैयक्तिक अनुभव (My Personal Experience) Sainik School Satara experience in Marathi

तर आता मला साधारण ४ वर्षे या शाळेत पूर्ण झालेत. सैनिक स्कूल सातारा मध्ये एकूण ६ Boarding  Houses आहेत. त्यामध्ये २ Junior(इयत्ता ६वी आणि ७वी) आणि ४ Senior Houses(इयत्ता ८वी ते १२वी) आहेत. मी ६वी मध्ये Nehru House मध्ये होतो. मला ८वी मध्ये Lal Bahadur Shastri House भेटले. प्रत्येक House ला एक House Suprident/Matron असतात. एका Houseमध्ये चार Dometries असतात. शाळेच्या कॅम्पस ४-५ फूटबॉल मैदाने आहेत. आंतरराष्ट्रीय स्तराचे बास्केटबॉल Ground आहे. 

सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा असते. प्रत्येक वर्गामध्ये SmartBoard आहेत. जेणेकरून विद्यार्थी Internet चा पण वापर करून शिक्षण घेऊ शकतात. वर्ग प्रशस्त आहेत. सगळे शिक्षक खूप छान शिकवतात. 

जर तुम्हांला/तुमच्या पाल्याला NDA मध्ये जायचे असेल तर हमखास या शाळेसाठी तयारी करू शकता. या शाळेमध्ये असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुमचे आरोग्य सुदृढ होते. या शाळेमध्ये Physical Training कडे जास्त लक्ष दिले जाते. सैनिक स्कूल सातारा मध्ये अशा काही सुविधा आहेत ज्या आपल्याला सर्वसाधारण शाळांमध्ये मिळत नाहीत. जसे की,

  • NCC / राष्ट्रीय छात्र सेना
  • Physical Training / शारीरिक प्रशिक्षण
  • Swimming Classes / पोहण्याचे वर्ग
  • Horse Riding / घोडेस्वारी
  • Auditorium A/C / सभागृह ए / सी
  • MI Room / एमआय रूम
  • Ball Sports / बॉल स्पोर्ट्स

sainik-school-Auditorium 
Auditorium

Cadet's-Mess Cadet's Mess

    International Basketball Ground

 Horse Riding 


Fee Structure

साधारण १ ते सव्वा लाख एका वर्षाची फी आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. कशासाठी किती पैसे आकारले जातात ते पण दिलेले आहे. 

Sr No    Heads     
Quarterly basis Rs.
Half-yearly basis Rs.
Yearly basis Rs.
 Fees  20,065   40,030
 79,860
2  Clothing  1,500 1,500  1,500 
3  Cadet Messing  15,486 15,486  15,486 
4   Pocket Money 1,500   1,500   1,500
5  Incidental charges  1,500  1,500  1,500
6 Additional charges  20,150  20,150   20,150
7 Caution Money (General)   3,000  3,000  3,000
8 Total payable by General Cadet at the time of admission   63,201 83,166  1,22,996 
9 Total payable by ( SC/ST cadet) at the time of admission   61,701  81,666  1,21,496
10  Remaining tuition fees. Payable in installments  Rs 20,065/- to be paid towards quarterly fees payable on 1 st of each quarter i.e 01 Sep, 01 Dec, and 01 Mar Rs 40,030/- to be paid towards fees II nd half yearly installment payable on 01 Dec  At the time of reopening of the school 
दरवर्षी शिकवणी फी वर 10% वाढ होते.
Data From SainikSatara.org 

Previous Year Question Papers (प्रश्नपत्रिका)

जर तुम्हाला मागील १० वर्ष्यांच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील या पोस्ट ला Visit करा  :) 
या पोस्टमध्ये १९९८-२०११ च्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत.  

सैनिक स्कूल परीक्षेसाठी पुस्तके 

Marathi Books (मराठी पुस्तके)



English Books (इंग्रजी पुस्तके)
हा लेख जर तुम्हांला आवडला असेल व माहिती मिळाली असेल तर Comment करून नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका. 
सध्या मी इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत आहे. मी इयत्ता नववी मध्ये ही शाळा सोडली. त्यास काही वैयक्तिक कारणे होती. 
जर तुम्हांला काही अडचण असेल तर मला Contact करु शकता.
sainik school satara information in marathi

Written and Published by Sudarshan Dalavi

Rate this article

Loading...
Sudarshan Dalavi Tech enthusiast with a passion for AI, coding, and startups. Delving into the complexities of hft's and smart investments. A bibliophile exploring the realms of literature, blen… Sudarshan Dalavi Tech enthusiast with a passion for AI, coding, and startups. Delving into the complexities of hft's and smart investments. A bibliophile exploring the realms of literature, blending creativity with a love for art, humanities, and culture. Love for Volleyball and interest in Cricket from childhood. Embracing versatility in a world of endless possibilities

18 comments

  1. Very Nice information Sudarshan. Thank you👍
  2. छान माहिती दिली सुदर्शन धन्यवाद🙏
    1. खूप खूप धन्यवाद :)
  3. खुप छान माहिती दिलेली आहे🙏🙏🙏
    1. खूप खूप धन्यवाद :)
  4. खुप छान माहिती दिलेली आहे
    1. खूप खूप धन्यवाद :)
  5. छान माहिती मिळाली, धन्यवाद.
    1. खूप खूप धन्यवाद :)👍
  6. Mala majhya mula sathi admission ghyacha ahe 6th sathi. Entrance exam sathi kahi books asatil tar pls
    1. विद्याभारती 6वी सैनिक शाळा प्रवेश मार्गदर्शक and Sainik School Class 6 Guide 2021
      आणि स्कॉलरशिप व नवोदय ची पुस्तके पण बेस्ट आहेत... :)
      All the best for exam 👍👍
  7. खुप छान माहिती
  8. छान माहिती आहे अर्ज कसा करायचा
  9. शिक्षण किती वर्षाचे असते
  10. मला माझ्या मुलासाठी इयत्ता सहावी साठी प्रवेश घ्यायची ईच्छा आहे, परंतु तारीख संपल्यामुळे exam form भरला नाही, काही करता येऊ शकते का, प्लीज guide
    1. Mala Majha Mulla sahti sahti Pravesh Pravesh tarikh sampla exam form Bhar la nahi kahi karta AVN Shakti ka please Uttar
  11. Supercalifraglisticexpladcious
  12. Call mi

Cookies Consent

This website uses cookies to ensure you get the best experience on our website.

Cookies Policy

We employ the use of cookies. By accessing Lantro UI, you agreed to use cookies in agreement with the Lantro UI's Privacy Policy.

Most interactive websites use cookies to let us retrieve the user’s details for each visit. Cookies are used by our website to enable the functionality of certain areas to make it easier for people visiting our website. Some of our affiliate/advertising partners may also use cookies.